corona death
आरोग्य, जळगाव

जळगावच्या ईश्वर कॉलनीत एक प्रौढ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या रुग्णांची संख्या चारशेवर पोहचत असताना शहरातील नानीबाई रुग्णालयाजवळील ईश्वरकॉलनी येथील एका प्रौढाचा खासगी लॅबकडून अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलताना दिली.

kirana

दरम्यान हे गृहस्थ गेल्या अनेक दिवसांपासून घरीच थांबून होते. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पंचमुखी हनुमान मंदिर ते कासमवाडी रस्त्यावर ईश्वरकॉलनी असून या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तेथे पोहचले आणि नऊ व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. त्या प्रौढाला बाधा नेमकी झाली कशी याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून परिसरात तात्काळ फवारणीही करण्यात आली.