Home Cities अमळनेर पाडळसरे आंदोलनास माजी सैनिकांचा पाठिंबा

पाडळसरे आंदोलनास माजी सैनिकांचा पाठिंबा


 

b18b17b8 5c51 47c3 9f52 8b8a11507bd1

अमळनेर (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी पाडळसरे धरण संघर्ष समितीचे गेल्या सहा ते सात दिवसापासून साखळी उपोषण तहसील कार्यालय समोर सुरू आहे. या आंदोलनाला माजी सैनिकांचे पूर्ण पाठिंब्याचे पत्र संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांना नुकतेच दिले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील ही उपस्थित होते.

या उपोषणाला आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील माजी मंत्री,आमदार, माजी आमदार, पासून सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचा पाठिंबा मिळत असताना माजी सैनिकांचा ही या पाडळसरे धरण पूर्ण झाले पाहिजे,असे मत सैनिक संघटनेचे अध्यक्ष बळीराम वानखडे यांनी व्यक्त केले. यावेळी सुभेदार मेजर दुर्योधन पाटील (उपाध्यक्ष, ) हवालदार राजेंद्र जगताप, नाईक नितीन बोरसे, नाईक राजेंद्र यादव व इतर माजीसैनिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound