पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) । पहूर कोविड रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या दोन महिलांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांना तातडीने जळगाव कोविड रूग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी दिली.
दरम्यान, काल आर.टी. लेले हायस्कूल येथील विलगीकरण कक्षास प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. अखेर आर.टी.लेले हायस्कूल येथील विलगीकरण कक्षातीत सर्व रुग्णांची रात्री १०च्या सुमारास महावीर पब्लीक स्कूल येथे विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. पहूर कसबेच्या सरपंच ज्योती शंकर घोंगडे, पेठच्या सरपंच निता रामेश्वर पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीच्या वतीने जेवणासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या जात आहे.