पाचोरा प्रतिनिधी । कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी याप्रमाणे – तालुकाध्यक्ष प्रल्हाद वाघ, तालुका कार्याध्यक्ष मयुर वाघ, तालुका उपाध्यक्ष सचिन कोकाटे, तालुका सचिव सौरभ पाटील, तालुका संघटक – देविदास साळवे, तालुका सहसंघटक प्रदिप पाटील यांची निवड केली आहे.
संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविणार- प्रल्हाद वाघ
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याची नुकतीच घोषित करण्यात आली. कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण आजबे, राज्य संघटक श्रीकांत राजपूत, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल पाटील, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अमोल बिडे यांच्या मार्गदर्शनाने व प्रल्हाद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेईल असे प्रल्हाद वाघ यांनी सांगितले.