Website accident icon blue
क्राईम, राज्य

यवतमाळजवळ मजुरांच्या बसला भीषण अपघात ; ४ ठार, २२ जखमी

शेअर करा !

यवतमाळ (वृत्तसंस्था) बस सोलापुरहून झारखंडच्या दिशेने मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले आहेत. यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला.

kirana

m

आर्णी तालुक्यातील कोळवन गावाजवळ मंगळवार (दि. १९ मे) रोजी पहाटे ४. ३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अनुज मांगीकर, सुनीता साडू, सोनू सिंग, तिघेही रा. झारखंड, तर एसटी चालक शिंदे, रा. सोलापूर, असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सोलापूरवरून २२ ते २५ मजूर घेऊन एसटी बस क्रमांक इमएच – १४ बीटी- ४६५१ झारखंडकडे निघाली होती. अशात मंगळवारी पहाटे आर्णी तालुक्यातील कोळवन गावाजवळ उभा टिप्पर क्रमांक टीएस ०७ उए २६०८ वर एसटी बसने धडक दिली. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले असल्यामुळे मृतकाचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.