Home Cities जळगाव पाकवरील हल्ल्यानंतर जळगावात आनंदोत्सव ( व्हिडीओ )

पाकवरील हल्ल्यानंतर जळगावात आनंदोत्सव ( व्हिडीओ )

0
69

जळगाव प्रतिनिधी । आज पहाटे भारतीय हवाईदलाने पाकमध्ये जाऊन केलेल्या कारवाईबद्दल जळगावात जोरदार जल्लोष करण्यात आला.

शहरातील टॉवर चौकात स्वामी विवेकानंद बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पुढाकाराने हवाई दलाच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जोरदार आतषबाजी करून भारत माता की जय असे नारे देण्यात आले. तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह राजकुमार अडवाणी, फारूक शेख, विजय वाणी आदी मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा– जळगावातील आनंदोत्सवाचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound