नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान प्रचंड घाबरलेला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाले आहेत.
आज भारताने नियंत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याबाबत तातडीची बैठक बोलावत सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. एकांदरीत पाकिस्तान बचावात्मक पवित्र्यात गेला आहे.
आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. यासंबधीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रामुख्याने पाकिस्तानी युजर्सकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. दरम्यान,या हल्ल्याने भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.