जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये मालेगाव येथे नियुक्तीस असणार्या पंकज मकराम राठोड या पोलीस कॉन्स्टेबलने अशोभनीय कृत्य केल्याचा ठपका ठेवून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी एका पत्रकान्वये माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत असणार्या पंकज मकराम राठोड या कर्मचार्याची मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तेथे कर्तव्यावर असतांना एका दैनिकाच्या प्रतिनिधीला दिशाभूल करणारी माहिती देऊन आपले मालेगाव येथे काम करतांना खूप हाल असल्याचे वृत्त छापून आले. या संदर्भात नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली. यात पंकज मकराम राठोड यांचा कांगावा समोर आला. यामुळे त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००