धरणगाव प्रतिनिधी । धरणगावहून आपली नोकरी आटोपून अमळनेर येथे जाणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी ये-जा न करता अमळनेरातच थांबणे पसंत करावे, अन्यथा धरणगावकरांना करोनाची झळ पोहचू शकते, अशी शक्यता सुज्ञ नागरीकांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार कमी प्रमाणात उपस्थितीत कामकाज करण्याची जरी परवानगी असली तरी अमळनेर येथून धरणगाव येथे नोकरीसाठी आलेल्या कर्मचारी लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत आहे. अमळनेर शहर आजच्या स्थितीत कोरोना पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट ठरला आहे. बहुसंख्य रूग्ण हे अमळनेर तालुक्यातील असल्याने धरणगाव शहराला त्याचा फटका भविष्यात बसणार आहे. कारण सरकारी कर्मचारी हे नेहमी अपडाऊन करत आहे. दरम्यान अमळनेर शहरातून येत असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोना संक्रमित होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान अमळनेरहुन अपडाऊन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना ये-जा बंद करण्याची मागणी धरणगावकरांनी केली आहे.