जिल्हाधिकारी,एसपी, आणि डीन यांची बदली करा ; राष्ट्रवादीचे देसले यांचे ट्वीट

जळगाव (प्रतिनिधी) प्रशासकीय यंत्रणेमुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वैद्यकीय अधिष्ठाता यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांनी केला आहे. देसले यांनी याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख अनिया वैद्यकीय मंत्री राजेश टोपे यांना ट्वीट केले आहे.

 

 

योगेश देसले यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णाची शंभरी पार गेला आहे. हे सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे जशी मालेगावच्या मनपा आयुक्तांची उचलबांगडी झाली, तशीच जळगाव क्लेकटर,एसपी,व डीन यांचीही बदली करण्यात यावी. देसले यांनी हे ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख अनिया वैद्यकीय मंत्री राजेश टोपे यांना टॅग केले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज सकाळी तब्बल १६ कोरोना पॉझेटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ११६ झाली आहे.

Protected Content