Home Cities जळगाव लेवा पाटीदार व स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ हजाराची मदत

लेवा पाटीदार व स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ हजाराची मदत


जळगाव प्रतिनिधी । राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. शहरातील लेवा पाटीदार सोशल व स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार रूपयांची धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जावून सुपूर्त केला.

जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. भविष्यात कोरोनाबाधातांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दानशुरप्रेमींकडून आर्थीक मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड १९ यांच्या नावे ११ हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जावून सुपूर्त केला. यावेळी संस्थेचे स्वप्निल नेमाडे, अभिजीत महाजन, शक्ती महाजन, चंदन कोल्हे, हितेंद्र धांडे, अमोल धांडे, प्रविण चौधरी, सिंचन सरोदे, लिलाधर खडके, बंटी भारंबे, अक्षय कोल्हे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound