जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष जिल्हा महानगर शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी प्रविण रमेश जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नुकतीच केली.
प्रविण जाधव यांचे शिक्षण एमए शिक्षणशास्त्र झाले असून नूतन मराठा महाविद्यालय येथे सेवा करत आहेत. तसेच विविध क्षेत्रात ते पदावर व सामाजिक संघटनामध्ये कार्य करत आहेत. त्यांनी विद्यापीठ खेळाडू, क्रिकेट, कुस्ती, वेटलिफ्टिंग, कबड्डी या खेळांमध्ये विशेष नैपुण्य मिळविली आहे. ते सन १९९५ मुळगावी यावल येथून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता म्हणून करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोरजी काळकर, आ.सुरेश भोळे , जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा.उन्मेषदादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, डॉ.राजेंद्र फडके, आ स्मिताताई वाघ, आ चंदूभाई पटेल, माजी आ. गुरुमुख जगवाणी, सरचिटनीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, महापौर सौ.भारती ताई सोनवणे,माजी महापौर सिमा ताई भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती सुचिता हाडा, शोभाताई बारी, गटनेते भगत बालानी यांनी आभिनंदन केले.