जळगाव प्रतिनिधी । येथे कोरोना संशयित म्हणून नमून घेतलेल्या ३२ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून यात मृत कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
अमळनेर येथील मृत कोरोनाबाधीत महिलेच्या कुटुंबातील पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आज सकाळी माहिती जाहीर केली आहे. यानुसार येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.