एरंडोल, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नयेयासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना राबिण्यात येत आहे. यात आपला देखील खरीचा वाटा असावा म्हणून एरंडोल तालुक्यातील विखरण गावांत अश्वमेध महिला उत्पादन बचत गटातर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
जगात कोरोना व्हायरसचा थैमान घातला आहे अशावेळी अनेक संस्था, संघटना या आपापल्या परीने मदत करीत आहे. अश्वमेध महिला उत्पादन बचत गटातील महिलांनी सामाजिक जाणीव जपत मास्कचे वाटप केले. विखरण ग्रामपंचायतीमध्ये सर्व गावकऱ्यांना सोशल डिस्टन्स ठेवून मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोरोनासंदर्भात जनगृती संदेश देणारे फलक व रांगोळ्या काढून गावकर्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. बचत गटाच्या सुरेखा कमलेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.