सांगली (वृत्तसंस्था) कोल्हापूरच्या १९ वर्षीय तरुणीला जबरदस्ती दारु पाजून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मिरजेत घडली आहे.
मिरज रेल्वे स्टेशन समोर जनावरांच्या गोठ्याजवळ १९ वर्षीय तरुणीवर आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांनी बलात्कार केला. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित तरुणी मागील काही दिवसापासून मिरजमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती. बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.