Home आरोग्य धुळ्यात आणखी सात रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

धुळ्यात आणखी सात रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह


धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे आणखी सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा धुळे शहरातील, तर एक शिरपूर येथील असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सातही रुग्णांवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरीच थांबावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी धुळे जिल्ह्यात आज एकूण 5 रुग्ण आढळून आले होते. त्यात धुळे शहरात 4 तर शिंदखेडा तालुक्यातील एका 70 वर्षीय महिलेचा समावेश होता.


Protected Content

Play sound