Home आरोग्य चिंताजनक : नवी मुंबईतील आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

चिंताजनक : नवी मुंबईतील आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण


नवी मुंबई (वृत्तसंस्था) महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीतील तब्बल १९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

 

कंपनीतील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून येताच प्रशासनाने संबंधित आयटी कंपनीला तात्काळ सील ठोकले आहे. या १९ जणांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर वाशी रुग्णालयातील करोना रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली आहे. बाधित रुग्णांपैकी मुंबई व नवी मुंबईतील प्रत्येकी सात जण आहेत. ठाणे व तेलंगणातील प्रत्येकी दोघे असून एक सांगलीचा आहे. तेलंगण व सांगलीतील तिघांनी मार्चपासून या कंपनीत काम सुरू केले होते. एका खासगी लॅबमध्ये कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली होती.


Protected Content

Play sound