धरणगाव प्रतिनिधी । शहरात ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये याची पुर्वतयारी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांची हतनूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी यांनी मंजूर केली आहे. धावडा येथे गूळ प्रकल्पातून हे आवर्तन सोडण्यात असून नगराध्यक्षांची कार्यतत्परता पाहून धरणगावकर समाधान व्यक्त करत आहे.
आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरी
दरम्यान, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भातील सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. भविष्यात ऐन उन्हाळ्यात धरणगावकरांना पाण्याची कोणतीही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी हतनूर धरण व चोपडा येथील गूळ प्रकल्पातून पाण्याचा आवर्तननाची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. पैकी हतनुर धरणातून धरणगाव शहराला पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंजूरी दिली असून धरणगाव नागपरिषद पाणीपुरवठा प्रकल्प धावडा येथे गूळ प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले आहे.
शहरासाठी पाणीपुरवठाचे यशस्वी नियोजन करून लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या कार्यक्षमता व कामाची हातोटी याबाबत समस्त धरणगावकर समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच निलेश चौधरी यांच्याकडे पाणीटंचाईच्या दृष्टीने धरणगावकर अपेक्षा ठेवून होते. प्रशासकीय कामांचा कोणताही पूर्वानुभव नसतांना नगराध्यक्ष या नात्याने पाणीटंचाईवर केलेली मात हे निलेश चौधरी यांचे मोठे यश मानले जात आहे. यासंदर्भात शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, शहराध्यक्ष राजू महाजन, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासूदेव चौधरी, उपनगराध्यक्ष अंजलीताई भानूदास विसावे यांनी अभिनंदन केले आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द
प्रशासनाने पाण्याच्या पातळीची केली पाहणी
तसेच भविष्यात देखील याच प्रकारे शहराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष निलेश चौधरी दिली आहे. या कामी धरणगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी जनार्धन पवार, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, किशोर खैरनार, भैय्या महाजन, मयूर बागुल यांनी धावडा डोहात पाण्याच्या पातळीची नुकतीच पाहणी केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/536475737049371/