जळगाव प्रतिनिधी । शहरातील लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले आहे. सर्व हॉटेल्स व दुकाने बंद असल्यामुळे शहरातील मुके जणावरे भटके कुत्र्यांची उपासमारी होत आहे. ॲनिमल हेल्थ केअर गृपतर्फे भटक्या कुत्र्यांसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे.
जगभर धुमाकुळ घातलेल्या कोरोना संसर्गाने देशासह राज्यात पाय पसरले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी लागू असल्याने रस्ते ओस पडले आहेत. यातच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह प्राणी, पक्ष्यांची गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांचे अन्न पाण्याविना उपासमारी सुरू आहे. तसेच रस्त्यावरून कुत्र्यांचे कळपच्या कळप फिरू लागले आहेत. रस्त्यावरून घोळक्याने फिरणारे माणसांचे कळप अचानक बंद झाले आहे. या दरम्यान स्ट्रीट अनिमल हेल्थ केअर प्राणी मित्र गृप यांचा पुढाकारातुन भटक्या कुत्र्यांसह गाई, मांजरी, पक्षी यांना अन्न, खाद्यपदार्थ पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे. सकाळ व संध्याकाळी दिले जात आहे अन्न खाद्यपदार्थ ,
सोशल डिस्टन्सिंगचे पालन
दरम्यान सर्व प्राणीमित्र वेगवेगळ्या परिसरात जाऊन स्वतःची काळजी घेत मास्क, हातात हॅन्ड ग्लोज घालून १०० ते २०० मोकाट कुत्र्यांना अन्न देण्याची व्यवस्था करीत आहेत. ग्रुपचे प्रदिप पाटील, मयूर वागूळदे, तेजस मोरे, भावेश पाटील, अमित बारी, दिपक सूर्यवंशी, अमोल सुतार, सचिन पाटील हे सर्व प्राणीमित्र पिंप्राळा, खोटेनगर, वाटिकाश्रम, शिवाजी नगर, खंडेरावनगर, हिरीविठ्ठल नगर, वागनगर, रामानंदनगर, एम.जे. कॉलेज परिसर, रिंग रोड, गणेश कॉलनी, शिव कॉलनी परिसरातील मोकाट प्राण्यांना पोळ्या देऊन भुक भागवितांना दिसत आहेत.