धरणगाव प्रतिनिधी । येथील माळी समाजाचे सचिव दशरथ झेंडू माळी यांची कन्या चि. सौ. का. सुवर्णा हीचा विवाह एरंडोल येथील हॉटेल नीलम गार्डनचे मालक सुरेश मुकुंदा महाजन यांचे चिरंजीव आकाश यांच्याशी आज रोजी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन साध्या पद्धतीनेविवाह घरगुती वातावरणात पार पाडला. विशेष म्हणजे यावेळी वधू पित्याने सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजाराचा चेक शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे सुपूर्द केला.
वधू पिता दशरथ झेंडू महाजन यांनी सामाजिक बांधिलकी ठेवत व महात्मा फुलेंच्या विचारांना आदर्श मानत वधू आणि वरांच्या नावाने २ लाख रुपयांचा चेक (स्वामी विवेकानंद पतसंस्था धरणगाव) वधू वरांना देण्यात आला. देशात व राज्यात बऱ्याचश्या लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे व काही लोक मृत्युमुखी पडत आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वधू पिता दशरथ महाजन यांनी देश व राज्यावरचे संकट हे माझ्या परिवारावर संकट आहे ही भावना जागृत ठेऊन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधिस ११,००० /- रु. चेक विवाह प्रसंगी धरणगाव शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी एरंडोलचे मा. नगराध्यक्ष देवीदास महाजन तसेच धरणगाव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन व वर वधूचे माता पिता व मामा हेच उपस्थीत होते. वधू वरांच्या नावे २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधिस ११,०००/- रुपयाचा चेक दिल्याबद्दल वधू पित्याचे गुलाबराव वाघ, देवीदास महाजन, विठोबा महाजन यांनी आभार मानले व वधू वरांना शुभेच्छा दिल्या.