Home Cities अमळनेर नंदगाव ते गांधली रस्ता नुतनीकरणासाठी १० लाखांचा निधी-जयश्री पाटील

नंदगाव ते गांधली रस्ता नुतनीकरणासाठी १० लाखांचा निधी-जयश्री पाटील

0
32



अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव ते गांधरी रस्ता नुतनीकरणासाठी दहा लाख तर मोरी मजबुतीकरणासाठी ८.४४ लाखांचा अतिरिक्त निधी मिळाला असल्याची माहिती जि.प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कळमसरे-जळोद जि प गटात जि.प.च्या ३०५४/२१३२ अंतर्गत नंदगाव ते गांधली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १० लक्ष १७ हजार ५७२ रु निधी मंजूर झाला आहे. यासोबत ५०५४/४१३ अंतर्गत नंदगाव येथे मोरी बांधकामासह डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी ८ लक्ष ४४ हजर २३५ रु निधी मंजूर होऊन प्राप्त झाला असल्याची माहिती या गटाच्या जि. प. सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी दिली.

नंदगाव गांधली रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती,अखेर जि प सदस्या जयश्री पाटील यांनी या रस्त्याचे महत्व ओळखून मंजुरीसाठी जि प कडे जोमाने पाठपुरावा केला,यामुळे या कामास मंजुरी मिळाली असून सौ जयश्री पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound