Home आरोग्य जय गणेश फाउंडेशन व रोटरीतर्फे रक्तदान शिबिर

जय गणेश फाउंडेशन व रोटरीतर्फे रक्तदान शिबिर

0
36

भुसावळ प्रतिनिधी । आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. त्या अनुषंगाने जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या संयुक्त विद्यमाने आज संतोषी माता बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

रक्तपेढ्यांमध्ये रक्त बॅगचा तुटवडा होऊ नये यासाठी येथील जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११ ते २ दरम्यान रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व दवाखान्यातील रक्त पेढीचे डॉ. नितीन भारंबे,डॉ.विजयकुमार वानखेडे,डॉ.एस.एम.शेख,डॉ. लक्ष्मण पाटील,डॉ.राजेश वारके, डॉ.राज तनवार यांनी रक्तदात्यांची तपासणी करून नाव नोंदणी केली.तसेच शिबिरात रक्तदान करणार्‍या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यशस्वीतेसाठी आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सचिव राजेंद्र यावलकर, जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर, गणेश फेगडे, प्रकल्प प्रमुख सरफराज तडवी,तुषार झांबरे, विरेंद्र पाटील, सी.जी.पवार,रविंद्र पाटील, खेमचंद भंगाळे,राहुल बावस्कर, नचिकेत यावलकर यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले.


Protected Content

Play sound