भुसावळ येथे प्रशासनातर्फे निवारागृहातील नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती

 

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना काळजी घ्यावे असे आवाहन येथील लोणारी मंगळ कार्यालयातील निवारागृहातील स्थलांतरीत नागरीकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. या नागरीकांमध्ये जनजागृती होऊन कोरोना सोबत लढण्याची उर्जा या ठिकाणी नागरीकांना मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

गरिकांमध्ये जनजागृती होऊन कोरोना सोबत लढण्याची ऊर्जा या ठिकाणी नागरिकांना मिळत असल्याचे आज पाहायला मिळाले. याबाबत सविस्तर सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने स्थलांतरित नागरिकांना शहरातील शासकीय निवारागृहात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणासह, नास्ता व इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जात असल्यातरी त्यासोबतच जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या व रेणुका प्रसाद, भारती पाटील मार्गदर्शननुसार महिला बाल सहाय्य कक्ष शोभा यंशवंत हंडोरे यांनी या नागरिकांना समुपदेशन करून कोरोनासोबत लढण्याची ताकत दिली. यावेळी निवासी कॅम्प मधील नागरिकांनी समुपदेशन कर्त्यांचे व मनोबल दृढ करणेसाठी प्रशासनाचे देखील आभार मानले. यावेळी जिल्हा प्रशासनच्या वतीने भुसावल शहरचे अधिकारी तलाठी रतनानी, रेल्वे कमरचारी व प्रशांत वैशवण उपस्थित होते. हे या ठिकाणची संपूर्ण चोख जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले.

Protected Content