ठाणे (वृत्तसंस्था) गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभियंता अनंत करमुसे नामक व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाइट बंद करून ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती. त्यावर अनंत करमुसे याने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. दरम्यान, त्या रागातून आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी आपणास आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या करमुसे यांनी केला होता. याप्रकरणी आज सकाळी या पाच जणांना अटक केली. या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.