Home Cities जळगाव जिल्ह्यातील ११ तहसीलदारांच्या बदल्या

जिल्ह्यातील ११ तहसीलदारांच्या बदल्या



जळगाव (प्रतिनिधी) आज एका शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ११ तहसीलदारांची बदली करण्यात आली असून त्यांना आजच कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी लगेचच नव्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून ते आपला पदभार लवकरच स्वीकारतील.
बदली झालेल्यांमध्ये यावल येथील तहसीलदार कुंदन हिरे यांची धुळे येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव येथून धान्य वितरण अधिकारी पदावर असलेले जितेंद्र कुंवर हे नवे तहसीलदार म्हणून येत आहेत .

 

भुसावळ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची नंदुरबार येथे बदली झाली असून त्यांच्या जागी त्र्यम्बकेश्वर नाशिक येथून महेंद्र पवार हे येत आहेत. पाचोरा तहसीलदार बंडू कापसे यांची कळवण येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तेथूनच कैलास चावडे हे येत आहेत. चोपडा तहसीलदार दीपक गिरासे यांची त्र्यंबकेश्वर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे येथून अनिल गावित हे येत आहेत. रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथून श्रीमती उशाराणी देवगुणे ह्या येत आहेत. भडगावचे तहसीलदार सी. एम. वाघ यांची कर्जत येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पारनेर येथून गणेश मरकड हे येत आहेत.

 

अमळनेर तहसीलदार प्रदीप पाटील यांची चांदवड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथून शरद घोरपडे हे येत आहेत. जळगाव तहसीलदार अमोल निकम यांची संगमनेर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. धरणगाव तहसीलदार सी. आर. राजपूत यांची मालेगाव येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तेथूनच मिलिंद कुलथे हे येत आहेत. जळगाव येथील संजय गांधी योजनेचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची नगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीरामपूर येथून सुभाष दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारोळा तहसीलदार प्रशांत पाटील यांची नाशिक येथे निवडणूक तहसीलदार म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी तेथूनच ए. बी. गवांदे हे येत आहेत. चाळीसगावचे तहसीलदार कैलास देवरे यांची जळगाव येथे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणात बदली झाली असून त्यांच्या जागी कोपरगाव येथून किशोर कदम हे आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound