जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 31 मार्च, 2020 पर्यंत सीमा बंदी कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 31 मार्च, 2020 पर्यंत सीमा बंदी लागू करण्यात आली होती. शासनाने 14 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली असल्याने तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्यात वाढ होऊ नये म्हणून दिनांक 23 मार्च, 2020 ला सीमा बंदी केलेली होती. ती 15 एप्रिल, 2020 च्या रात्री एक वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.