वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे गेल्या २४ तासात अमेरिकेत तब्बल ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे. अमेरिकत शनिवारी मृतांचा आकडा २०१० एवढा होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेत १ लाख ते २ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इटली, स्पेन, अमेरिकेनंतर कोरोनामुळे फ्रान्समध्ये जास्त प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक ४९९ लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत फ्रान्समध्ये कोरोनामुळे ३५२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूंमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००