हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादमध्ये एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्याच्या अंत्यसंस्काराकडे कुटुंबीयांनी पाठ फिरवल्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीच या रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हैरदाबादमध्ये ज्या ७४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयही आले नाहीत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करावे लागले. तेलंगणमध्ये आत्तापर्यंत ७० जणांना करोनाची बाधा झाली आहे.