कोरोनामुळे अमेरिकेत १ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

 

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोनामुळे पुढील काही दिवसात १ लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारांनी व्यक्त केल्यामुळे सध्या अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

अमेरिका सरकारच्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारांनी व्यक्त केलेल्या धोक्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या सावटाखाली असणारी अमेरिका रुळावर आणू, असा दावा करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ट्रम्प यांनी १२ एप्रिल म्हणजे ईस्टर डेपर्यंत अमेरिकेत सर्वकाही सुरळीत झालेले असेल, असा दावा केला होता. ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्वकाही सुरळीत होईल, या आशेने देश लॉकडाऊन करणे टाळले होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर आतापर्यंत २४६० अमेरिकन नागरिकांनी आपला जीवही गमावला आहे. मात्र, येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक वेगाने लोकांचा मृत्यू होईल, अशी शक्यता वैद्यकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

Protected Content