चाळीसगावातील वार्ड क्रमांक ७ मध्ये तरूणांनी राबविले स्वच्छता अभियान

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी वार्ड क्रमांक ७ मधील तरूण एकत्र येत साफसफाई स्वच्छता केली आहे. मात्र नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

सध्या जगात संसर्गजन्य साथरोग कोरोना कोविड १९ या विषाणूंने थैमान घातले आहे. या लॉकडाऊन सुरू केले आहे. तर महाराष्ट्रात सर्वपक्षीय आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रा.पं. सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते आप – आपल्या वार्डात परिसरात फवारणीसाठी, घाण साफ – सफाई साठी पुढे येत आहेत. परंतु खासदार उन्मेश पाटील यांच्याच वार्डात साफसफाई होत नसल्याने तेथील तरुण युवकांनी एकत्र येऊन आज २८ मार्च रोजी आपल्या परिसरातील गटार, कचरा, साफ केला व गटारीचे घाण पाणी नाल्यात सोडले. त्याप्रसंगी गल्लीतील शिवाजी गवळी, किसन गवळी, मनोज गवळी, कुंदन गवळी, कमलेश गवळी, किरण गवळी, सागर पवार, दादा खंडागळे, गोपाळ देवरे, शिवाजी दहिहंडे आदी ग्रामस्त उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी हिरीरीने भाग घेतला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने व नगरसेवक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Protected Content