झारखंडकडे खासगी वाहनांमध्ये जाणारे १५ जण पोलिसांच्या ताब्यात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पेठ पोलीस महामार्गावर गस्त असतांना मुंबईहून झारखंड येथे जाणाऱ्या चार कालीपीली टॅक्सींवर कारवाई करण्यात आली असून त्यांतील १५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया रवाना करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, देशात गेल्या चार दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातही त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलीसांनी गस्त घातली आहे. दरम्यान आज सकाळी ११ वाजेच्यासुमारास बहिणाबाई गार्डनजवळ मुंबईहून झारखंड येथे जाणाऱ्या मुंबईच्या खासगी टॅक्सींवर जिल्हा पेठ पोलीसांनी चौकशी करत झारखंड येथे जात असल्याचे समजले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी चारही वाहने ताब्यात घेत त्यांची १५ जणांची चौकशी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने मुंबई सोडून झारखंड येथे जात असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक पटेल यांनी १५ जणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी रवाना केले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/208790737121083/

Protected Content