यावल प्रतिनिधी । येथील यावल-भुसावळ रोडवरील पेट्राल पंपाजवळ रोडच्या कडेला स्त्री जातीचे एक दिवसाचे नवजात अर्भक एका महिलेला मिळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. लवकरच जळगाव येथील पाळणाघरात पाठवण्यात येणार आहे.
यासंदर्भात वृत्त असे की, यावल-भुसावळ मार्गावर यावलपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेले एका पेट्रोल पंपाच्या पुढे रोडच्या कडेला आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका दिवसाचे नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यावल शहरात राहणाऱ्या व मोलमजुरी करून आपल्या पोटाची खडगी भरणाऱ्या मंगला विष्णू पारधे या महिलेस नेहमीप्रमाणे शेतातून काम करून परत येत असताना लहान बाळाचे रडण्याचे आवाज ऐकू आले. एका रंगाच्या कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक दिवसाच्या जन्माला आलेले स्त्री जातीचे बाळ दिसून आले. मंगला पारधे यांनी तात्काळ या बाळाला उचलून घरी घेऊन आल्यानंतर मंगला पारधे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारधे यांनी त्या बाळास यावल पोलीस स्टेशनला आणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना सविस्तर माहिती कळवली.
पोलीस निरक्षक धनवडे यांनी सदर मुलीची प्रकृतीची दखल घेत तिला तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठविले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी त्या बळावर प्रथमोपचार उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हे पाठविण्यात आले.
मंगला पारधे या महिलेसह अनेकांनी बाळाचा घेण्याची इच्छा प्रकट केली परंतु कायदेशीररित्या पुढील ६ महिने ह्या बाळास पाळणाघरात रहावे लागेल अशी माहिती मिळाली आहे. दरम्यानच्या काळात सदर हे एक दिवसाचे स्त्री जातीचे बाळ कुणाचे असावे यासंदर्भात नागरिकांच्या चर्चेत तर्क-वितर्क लावले जात होते.