कोरोना: यावल शहरात संचारबंदीत प्रांताधिकारी उतरले रस्त्यावर

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना यावल शहरात काही भागात जमावबंदीचे उल्लंघन करून बिनधास्त फिरत आहे. आज फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

राज्यात कोरूना विषाणूच्या प्रार्दुभावचा धोका निर्माण झाला असून या करुणाच्या अत्यंत विषारी व मानवी जीवनाला घातक अशा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही कारण नसताना काही नागरिक जमावबंदीचा आदेश मोडून बिनधास्तपणे शहरात फिरताना दिसत आहे. या जमावबंदीचे आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी २६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी यावल शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या बुरुज चौकत उपस्थित राहून संचार बंदीचे आदेश मोडून फिरणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी त्यांच्यासोबत यावरचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे महसूल कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनीही आपले कर्तव्य पार पाडले. याप्रसंगी प्रांत अधिकारी थोरबोले, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कोरोना विषाणू संदर्भात शासनाने दिलेले आदेशाचे अग्रक्रमाने शिस्तीने पालन करण्याचे व नागरिकांना दक्ष जागृत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Protected Content