अमळनेरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १६ जणांवर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर अमळनेर शहरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १६ जणांविरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी अमळनेरात बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील अग्रवाल उपहार गृहाचे मालक हरीश प्रेमचंद अग्रवाल आणि अग्रवाल डेअरीचे मालक विशाला राजकुमार अग्रवाल यांना सुचना देवून दुकानावर गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी या दोघांवर भादवी कलम १४४ प्रमाणे गुन्हा दाखल केला तर संचारबंदी लागू असतानाही विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या जगदीश नाना पाटील (वय-२५) रा. पैलाड शनीपेठ, मुख्तार अब्दुल राज्जाक (वय-३८) रा. कसाली मोहल्ला, जहीर अली कमर अली (वय-३८) रा. गांधलीपुरा, भगवान पोपट पाटील (वय-६५) रा. स्टेटबँकेसमोर, सुरेश सुकलाल चौधरी (वय-४४) रा. बंगाली फाईल, कमलेश हरीश जोशी (वय-२५) रा.शिरूड नाका, आधार उत्तम पाटील (वय-४८) रा. पळासखेडा, रतीलाल जयराम पाटील (वय-६३) रा.पैलाड, राहुल प्रभाकर पाटील (वय-२२) रा. रामेश्वर खुर्द, लीलाधर पुंडलिक कुंभार (वय-४०) रा.पैलाड, राहुल गुलाब चौधरी (वय-३६) रा.पातोंडा ता.अमळनेर, रायसिंग पांडुरंग पाटील (वय-५२) रा.खोकरपाट, किशोर दिनकर देवरे (वय-२४) रा.पातोंडा ता. अमळनेर, शांताराम भालेराव पाटील (वय-३१) रा.पातोंडा ता. अमळनेर, नाशिर शेख इकबाल (वय-३७) रा.जुना पारधीवाडा, समाधान जिजाबराव पाटील (वय-३२) रा.संताजीनगर यांच्यावर अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल करण्यात आला आहे.

Protected Content