पुणे वृत्तसंस्था । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते.
आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला. पिंपरी-चिंचवड शहरात दुबईहून आलेल्या तिघांना करोना विषाणू ची बाधा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. पिंपरी-चिंचवड शहरात ऐकून १२ करोना बाधत आढळले होते. डॉ. विनायक पाटील आणि त्यांच्या स्टाफ च्या अथक प्रयत्नानंतर १४ दिवसांनी तीन करोना बाधित रुग्णाच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांना आज अकराच्या सुमार डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णवाहिका मधून घरी सोडण्यात आले. त्यापूर्वी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर स्टाफने रुग्णाचे मनोबल आणि डॉक्टरांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या.