धक्कादायक ! करोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी रुग्णाने घेतली १०० जणांची भेट; गावे केली सील

चंदीगड वृत्तसंस्था । पंजाबमध्ये करोनामुळे १८ मार्च रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीमुळे राज्यातील २३ जणांना लागण झाली आहे. पंजाबमध्ये एकूण ३३ जणांना करोनाची लागण झाली झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पंजाब राज्यातील अनेक गावे सिल करण्यात आली आहे.

गुरुद्वारात धर्मगरु असणाऱी संबंधित ७० वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांसाठी परदेशात वास्तव्यास होती. जर्मनी आणि इटली येथे आपल्या शेजारच्या गावातील दोन मित्रांसोबत ते गेले होते. मात्र परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले नव्हते. अनेकांची ते भेट घेत होते. ६ मार्च रोजी ते दिल्लीत पोहोचले आणि तेथून पंजाबला वाहनाने प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ८ ते १० मार्च दरम्यान आनंदपूर साहिब येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परतले होते.

धक्कादायक म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी १०० जणांची भेट घेतली होती. त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मित्रांनी राज्यातील १५ गावांचा दौरा केला होता. त्यांच्या कुंटुंबातील १४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांचा नातू आणि नातीने तर हजारो जणांची भेट घेतली आहे.

तिघांच्या बेजबाबदार वागण्यामुळे अधिकारी प्रत्येक गावाला भेट देत असून त्यांनी भेट घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहेत. या तिघामुळे मोहाली, अमृतसर, होशियारपूर, जलंधर या गावातील काही लोकांना करोनाची लागण झाली आहे.

Protected Content