एरंडोल तालुक्यातील जि.प.शिक्षकांची कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील एरंडोल पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संख्या ३६९ या सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकजूट होऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या एका दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांना देऊ केला आहे.

देशावर आलेल्या साथरोग संसर्गजन्य कोरोना विषानुवर मात करण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू आहे. अनेक क्रिकेटपटू , व अभिनेत्यांनी शासन व प्रशासन यांना मदत म्हणून लाखोंरुपयांची मदत केली. त्याअनुषंगाने तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी कोरोनाग्रस्तांसाठी स्वयंस्फूर्तीने एक दिवसाचा पगार देण्याचा निश्चय केला. याबाबतत्यांनी भ्रमणध्वनीद्वारे तालुक्याचे गट विकास अधिकारी बी. एस. अकलाडे यांना व गट शिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील यांना मार्च २०२० च्या वेतनामधून एक दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांना देण्याची विनंती केली आहे. .

Protected Content