एरंडोलात संचारबंदीचे सर्रास उल्लंघन; प्रशासन हतबल

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरात सकाळपासून लॉकडाऊनचे उल्लंघन नागरिक करतांना दिसत आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या भगवा चौकात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने आहेत. त्याठिकाणी शहरातील लोक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहेत.

दरम्यान शहरातील भगवा चौक परिसरात किराणा दुकाने, बँक आहेत. याठिकाणी प्रशासनातर्फे व्यवस्थित आखणी करुन दिलेली आहे. परंतु काही मालवाहतुक करणारी चारचाकी वाहने घुसुन वाहतूकीचा खोळंबा करीत आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी होत आहे. सोबत काही नागरिकही प्रशासनाला न जुमानता विनाकारण गर्दी करत आहेत. शहरातील याच भागात असणाऱ्या स्टेट बँक येथे आखून दिलेल्या सर्कलमध्ये काही लोक उभे असलेले दिसले परंतु याठिकाणी आखलेल्या सर्कलपेक्षा जास्त लोक आल्याने जास्त गर्दी होत आहे. बाकी उरलेले लोक मात्र एका ठिकाणी गर्दी करतांना दिसत आहेत.

त्याच प्रकारे म्हसावद रस्त्यावर सर्रास वाहनांची वाहतुक सुरू असुन एका मोटारसायकल वर तिन ते चार लोक बसुन प्रवास करीत आहेत.सदर वाहतुक दिवसभर सुरू असुन नागरिक स्वतः बेजबाबदारपणे वागत असल्याचे लक्षात येत आहेत. दरम्यान एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकास अधिकारी बी.एस.अकलाडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख आदी जबाबदार अधिकारी स्वतः गावात व तालुक्यात फिरुन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन वजा विनंती करीत असुन देखील नागरिक मात्र येणाऱ्या संकटाला गंभीरतेने घेतांना दिसत नाही आहेत.

Protected Content