वेळोदे ग्रामपंचायतीतर्फे गावात फवारणी

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वेळोदा येथे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीतर्फे फवारणी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संपुर्ण गावात निर्जंतूक करण्यासाठी प्रल्हाद आनाजी सोनवणे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर फवारणी यंत्राने करण्यात आली. तसेच देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे.त्या धर्तीवर ग्रामपंचायतीने गावांतील सीमा सिल करण्यासाठी गावांतील प्रवेशाच्या ठिकाणी बॅरॅकेटस लावण्यात आले आहेत. टारगट मुलांचा त्रास टाळण्यासाठी ग्रामसेवक,संरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत शिपाई, सागर सैंदाणे, शरद बोरसे, गावांतील तरुण अरुण सोनवणे, रमाकांत बोरसे, बापु बोरसे,मनोज बोरसे, जयेश चौधरी, चेतन बोरसे, नितीन सोनवणे, मिलिंद करनकाळे यांनी सहकार्य केले. तर विनामूल्य ट्रॅक्टर फवारणी यंत्र दिल्याने प्रल्हाद सोनवणे यांचे गावकर्यानी आभार मानले. त्यांनी परिसरातील ग्रामपंचायतीनाही सहकार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Protected Content