धरणगावातील खासगी दवाखाने सुरू ठेवा : नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचे भावनिक आवाहन

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंधी लागू करण्यात आली आहे. शहरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद असल्यामुळे इतर रूग्णांचे हाल होत आहे. डॉक्टरांना देवदूत मानले जाते. आताच्या भयानक परिस्थितीत शहरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे भावनिक आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. आत्यावश्यकेच्या काळात खासगी डॉक्टरांनी सहकार्य केल्यास नगराध्यक्ष आणि धरणगावकर कायम ऋणी राहतील. आजची परिस्थिती पाहता हा लढा सर्वांना एकत्र लढावयाचा असून सर्वांनी सहकार्य करावे. वैद्यकिय अधिकारी, पोलीस प्रशासन, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि पत्रकार यांना कोणताही त्रास होणार नाही याची देखील नागरीकांनी काळजी घ्यावी.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी नागरीक व खाजगी वाहने रस्त्यावर येणार नाही, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा होणार नाही, फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी विक्रीस न बसता शासनाच्या निर्देशाप्रमाणे विक्री करावी, असे देखील आवाहन नगराध्यक्ष चौधरी यांनी केले आहे.

Protected Content