avinash dhakne
जळगाव

घाबरू नका : किराणा दुकाने सुरू राहणार

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार आजपासून सकाळी सात ते रात्री अकरा या कालावधीत किरणा दुकाने उघडी राहणार असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

spot sanction insta

किराणा दुकानदारांची संघटना आणि जिल्हाधिकार्‍यांमध्ये काल झालेल्या बैठकीनुसार आता किराणा दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. मात्र यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यात कर्मचार्‍यांना ओळखपत्रे द्यावी. कर्मचार्‍यांनी ओळखपत्रासह आधार कार्ड तसेच शॉप अ‍ॅक्ट व लायसन्सची प्रत सोबत ठेवावी. प्रत्येक कर्मचार्‍यास मास्क, साबण, सॅनिटायझर, हॅण्डवॉशने हात धुणे बंधनकारक करावे. ग्राहकांमध्ये अंतर ठेवून याच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षारक्षक नेमावेत आदींचा समावेश आहे.