Logo News
राज्य

एमआयएमच्या आमदाराचा रूग्णालयात राडा

शेअर करा !

मालेगाव । संचारबंदी सुरू असतांनाच येथील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल यांनी शासकीय रूग्णालयात गदारोळ करत वैद्यकीय अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

spot sanction insta

याबाबत वृत्त असे की, राज्यात संचारबंदी सुरू असताना मालेगाव येथे काल रात्री आठच्या सुमारास एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली. आमदारांचा फोन उचलला नाही यावरून आमदारांनी थयथयाट केला याप्रसंगी डांगे यांना शिवीगाळदेखील करण्यात आली. मालेगावच्या शासकीय रुग्णालयात करोनाचे दोन संशयीत रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. यामुळे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी काम बंद करून रुग्णालयासमोर ठिय्या दिला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रुग्णालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांदेखत झाला. पोलिसांनी यावेळी कोणतीही कारवाई केली नाही.