n1 1
आरोग्य, धरणगाव, राजकीय

धरणगाव शहरात सोडियम हाइपोक्लोराईटची फवारणी ; नगराध्यक्ष निलेश चौधरी लक्ष ठेवून

शेअर करा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात साफसफाई तसेच फवारणी, धुरळणी सातत्याने सुरु आहे. दरम्यान, आरोग्याबाबतच्या प्रत्येक उपाययोजनेवर स्वत: लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे लक्ष ठेवून आहेत.

spot sanction insta

 

शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण शहरात सोडियम हाइपोक्लोराईटची फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मोकळ्या जागा, गटारी इत्यादी ठिकाणी जंतुनाशक पावडर टाकण्यात येत आहे.नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी घरातच राहून नगरपालिकेला सहकार्य करावे विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे.