covid
आरोग्य

Shocking : माशांकडूनही होतोय कोरोनाचा प्रसार-अमिताभच्या दाव्याने खळबळ

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसचा प्रसार हा माशांच्या माध्यमातून होत असण्याचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले असून पंतप्रधान मोदी यांनी याला रिट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.

spot sanction insta

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून व्हिडीओ शेअर केला असून यात माशांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी लॅनसेट या मेडिकल जर्नलमधील लेखाचा हवाला दिला आहे. ते म्हणाले की, मानवी शौचामध्ये कोरोना व्हायरस हा अनेक दिवस जीवंत राहू शकतो. यावर माशी बसून ती अन्य खाद्य पदार्थावर बसली तरी कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे ट्विट हे रिट्विट केल्याने अजून चर्चेला उधाण आले आहे.