muktainagar
आरोग्य, मुक्ताईनगर, सामाजिक

नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये : सभापती शमीम बी अहेमद खान यांचे आवाहन

शेअर करा !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील आरोग्य व स्वच्छता सभापती शमीम बी अहेमद खान यांनी देशात लागू केलेल्या संचारबंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये असे आवाहन केले आहे.

spot sanction insta

आरोग्य व स्वच्छता सभापती शमीमबी अहेमद खान यांनी कोरोना व्हायरसच्या व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, एकत्र येऊ नये. स्वतःच्या घरात व आजूबाजूलाच्या परिसरात स्वच्छता ठेवा. कोरोना संसर्गजन्य रोग आहे ,या रोगापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडू नका. अत्यंत महत्त्वाचा काम जसे आरोग्य ,मेडिसिन किंवा जीवन आवश्यक वस्तू चे तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा ते टाळा. केंद्र व राज्य सरकारने १४४ कलम व संचारबंदी लागू केले असून नागरिकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

शहरात साफ सफाई करा – नागरिकांची मागणी
दरम्यान, नागरिकांनी आरोग्य सभापती यांना निवेदन देऊन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात डी. डी. टी. फवारणी करून नागरिकांना विविध आरोग्याच्या सुविधा देण्यात यावी. तसेच वार्ड क्र. ३, ४, ५, १०, ११ व इतर वार्डात साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर फरजानबी रफिक शेख, नफिसा शेख फिरोज, इमरान खान, अशोक कोळी आदींनी केली आहे.