ashram shala
आरोग्य, राज्य, सामाजिक

कोरोना लॉकडाऊन : ऊसतोड मजुरांच्या मुलांवर उपासमारीची वेळ !

शेअर करा !

बीड (वृत्तसंस्था) कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

spot sanction insta

 

वडवणी तालुक्यातील कान्होबाचीवाडी या गावातील ८० टक्के लोक उसतोडणीला गेले आहेत. या गावात ५० मुले ही प्राथमिक शिक्षण घेतात. १५ मार्चपासून शाळा बंद केल्याने या गावातील ऊसतोड मजूर मुलांसाठीचे हंगामी वसतिगृह बंद झाले. यामुळे गावातील ३५ मुलांच्या खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावात फक्त वयोवृद्ध माणसे आहेत. त्यांना काम होत नाही, पण शाळा बंद केल्यामुळे या मुलांना काय खाऊ घालावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय. अद्याप ऊसतोड मजूर गावी आले नाहीत. त्यामुळे या मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत पालक येणार नाहीत तोपर्यंत ही वसतिगृह सुरू ठेवावीत, अशी मागणी केली जात आहे.