jalgaon 6
जळगाव, सामाजिक

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बँकतर्फे कर्फ्यूमध्ये गरजुना जेवण वाटप

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण भारतात लॉक डाउन कर्फ्यू असताना सुद्धा निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बँकतर्फे गरीब, गरजु व अनाथ आजी-आजोबांची भूक शमविन्याचे कार्य अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

आजचे जेवण व नास्ता प्रतिष्ठानच्या निःस्वार्थ समाजसेविका गीत रंगलानी यांच्याकडून देण्यात आले होते. निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बँक च्या वतीने रस्त्यावरील गरीब,गरजु व अनाथ आजी-आजोबांना पोटभर जेवण वाटप करण्यात आले. यावेळी आजी-आजोबाना लॉक डाउन कर्फ्यू लागू असतांना सुद्धा आपली भूक शमविन्यासाठी जेवण मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी आजी-आजोबाना जेवण वाटप करताना श्री.रंगलानी व प्रतिष्ठानचे सुलतान भैया पटेल व धीरज जावळे आदी उपस्थित होते.

spot sanction insta