gun
क्राईम

काबूल : दहशतवादी हल्ल्यात ११ भक्तांचा मृत्यू !

शेअर करा !

काबूल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुलमधील एका गुरुद्वारावर आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ भक्तांचा मृत्यू झाला आहे.

spot sanction insta

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शोर बाजार परिसरातील तीन दहशतवाद्यांनी गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात किमान ११ जण ठार झाले आहेत. तर ११ जण जखमी झाले आहेत. या हल्लेखोरांशी बराच काळ सुरक्षा यंत्रणांचे जवान लढ देत होते. काबुल पोलिसांनी या गुरुद्वारामधून ११ मुलांची सुरक्षित सुटका केली आहे. हा हल्ला झाला तेव्हा गुरुद्वारामध्ये दीडशे भक्त प्रार्थना करत होते. दरम्यान, इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे एसआयटीईच्या गुप्तहेर गटाने म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये शीख समुदायावर अशाप्रकारचे अनेक हल्ले झाले आहेत.