रावेर दंगल: शहरात दोन तासांकरीत शिथिलता; प्रांतांचे आदेश

रावेर प्रतिनिधी । रावेर येथे दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना रविवारी २२ रोजी घडली होती. या घटनेमुळे गेल्या चार दिवसांपासून तणावाचे वातावरण शहरात झाले होते. आज दंगलीच्या चौथ्या दिवशी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पुन्हा आज दोन तासाची शिथितला दिली आहे.

संपुर्ण जिल्ह्यात शासनाच्या आदशानुसार कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्हातून या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आज चौथ्या दिवसी संचारबंदीला प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दोन तासांकरीता शिथिल करण्यात आली आहे. जिवनाश्यक वस्तू, भाजीपाला, दुध, मेडीकल, किरणा सामान खरेदी करण्यासाठी हे दोन तास देण्यात आले आहे. दरम्यान, पेट्रोल पंप बंदख्‍ टू व्हीलर, फोर व्हीलर वाहतूक बंद असेल तसेच दुपारी ४ नंतर संचारबंदी शहरात पुन्हा लागू होणार आहे.

Protected Content