Home आरोग्य धक्कादायक : राष्ट्रपती भवनात पोहोचला कोरोना ; राष्ट्रपती कोविंद करणार तपासणी

धक्कादायक : राष्ट्रपती भवनात पोहोचला कोरोना ; राष्ट्रपती कोविंद करणार तपासणी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरस राष्ट्रपती भवनपर्यंत पोहोचल्यामुळे खळबळ उडालीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे स्वत:ची तपासणी करून घेणार असल्याचे वृत्त आहे.

 

बॉलीवूड गायिका कनिका कपूरही कोरोना पॉझिटिव्ह होती. ९ मार्चला लंडनहून परतल्यानंतर १४ दिवस वेगळे राहण्याऐवजी ती लखनऊमध्ये पार्ट्या करत राहिली. यादरम्यान ती जवळपास ४०० हायप्रोफाइल लोकांच्या संपर्कात आली. त्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह व यूपीचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यात सहभागी होते. दरम्यान, पार्टीत कनिकासोबत सेल्फी घेणारे दुष्यंत संसदेत व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यामुळे खासदार दुष्यंत सिंह यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रपती भवनमधील सूत्रांनी माहिती दिली आहे की, राष्ट्रपती देखील तपासणी करुन घेणार आहेत. या सोबतच राष्ट्रपतींचे इतर नियोजीत कार्यक्रम देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Protected Content

Play sound